पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हँडबॉल (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 23.12.2025)- युनिव्र्हसिटी ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जयपूर येथे 08 ते 12 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ हँडबॉल (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये आदर्श महाविद्यालय, धामणगांव रेल्वेचा वेदांत व-हाडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा मधुर जोगळेकर, श्रेयस कांबळे, राजकुमार कासदेकर, कार्तिक मरसकोल्हे व कैलाश ठाकरे, स्व. दादाराव अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालय, धामणगांव रेल्वेचा वेदांत पंचबुध्दे, सरस्वती कला महाविद्यालय, दहिहांडाचा सुभान मुन्नीवाले, अभिषेक काळे व मंगेश इंगळे, इंदिरा महाविद्यालय, कळंबचा आदित्य सिरसाट व रवि भुशनवार, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा बंटी साहु, अनिकेत जाधव, जीवन पवार व तेजस हरमकर, एस.एस.जी.एम.सी.ई. शेगांवचा देवांग भोंडे, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीचा अमेय पोटे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा दर्शन सलामे आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा रामक्रिष्ण धिकार याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती येथे दि. 27 डिसेंबर, 2025 ते 05 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



