मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अमरावती विमानतळावर सकाळी आगमन झाले

अमरावती
त्यांच्या आगमनावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्थेचे कडक नियोजन करण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. विमानतळावर थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंजनगाव सुर्जी येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. या कार्यक्रमात विविध विकासकामांचा आढावा, स्थानिक प्रश्नांवर चर्चा तसेच नागरिकांशी संवाद साधण्याचा त्यांचा कार्यक्रम असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मा. उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामुळे अमरावती व अंजनगाव सुर्जी परिसरात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, त्यांच्या कार्यक्रमाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



