Amravatigold rateLatest News
सोन्या–चांदीच्या दरात वाढ

मुंबई/अमरावती, दि. ___ : सराफा बाजारात आज सोन्या–चांदीच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,३८६ रुपये इतका झाला असून, चांदीचा दर प्रति किलो १,९९,१०० रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार, डॉलरच्या तुलनेत रुपयातील बदल तसेच लग्नसराई व गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे सोन्या–चांदीच्या दरात चढउतार होत असल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरवाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भार वाढला असून, गुंतवणूकदार मात्र सोन्या–चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत असल्याचे चित्र आहे.



