AmravatiLatest News
आदिवासी विकास महामंडळाकडून 888 क्विंटल मका खरेदी

अमरावती | आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी कार्यालयामार्फत खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये शासनाच्या किंमत समर्थन योजना अंतर्गत धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एफएक्यू दर्जाचे ज्वारी, बाजरी, मका, रागी भरडधान्य खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत 888 क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.
🔹 नोंदणी आणि खरेदी कालावधी
- धान्य खरेदीसाठी नोंदणी कालावधी – 15 डिसेंबर 2025
- खरीदी कालावधी – 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत
- आतापर्यंत 1,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 248 शेतकऱ्यांकडून 888.40 क्विंटल मका खरेदी करण्यात आले आहे.
🔹 खरेदी केंद्रे
जिल्ह्यात धारणी उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत खालील खरेदी केंद्र कार्यरत आहेत:
- बैरागड
- सावलिखेड़ा
- साद्राबाडी
- चाकर्दा
- हरीसाल
- धारणी
- चिखलदरा अंतर्गत चुरणी आणि गोलखेडा बाजार
🔹 शेतकऱ्यांसाठी सूचना
प्रादेशिक व्यवस्थापक संतोष आमटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, धान्य आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून, स्वच्छ करून आणावे, तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.



