AmravatiBusinessLatest News

विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेस आयोजित‘बिझिनेस प्लॅन’ ला नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्याथ्र्यांनो, नोकरी घेण्यापेक्षा देणारे व्हा-डॉ. अजय लाड
अमरावती : उदयोन्मुख तरुणांनी नोकरी घेणा-यापेक्षा देणारे व्हा, असे आवाहन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळव्दारा आयोजित  ‘बिझिनेस प्लॅन स्पर्धा’-2025 ‘ कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख्य अतिथी म्हणून अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे सचिव श्री आशिष सावजी, इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद यादव, व्यवस्थापक अमोल हिरूळकर उपस्थित होते.
               डॉ. अजय लाड म्हणाले, प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात छोट्या स्वरूपात अॅक्टिव्हिटी बेस बिझनेस प्लॅन राबवावे. तसेच विद्याथ्र्यांना छोट्या स्वरूपात भांडवल उपलब्ध करून द्यावे. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात ही छोट्याशा प्रयत्नापासून होत असते, असेही ते म्हणाले.
               श्री आशिष सावजी म्हणाले, बिझिनेस प्लॅन हा कागदावरून प्रत्यक्षात साकारण्यासाठी विद्याथ्र्यांनी प्रयत्न करावे. नवीन व्यवसाय सुरु करतांना प्रत्येकांनी संधीशोधक असले पाहिजे. जिथे आपल्याला संधी मिळते, त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.
                विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पी.एम. उषा अंतर्गत बोर्ड ऑफ इनोव्हेशन इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेस आणि रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनच्या  संयुक्त विद्यमाने या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माद्यमातून विद्याथ्र्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त रूप देण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. उद्योजकता, नवोपक्रम आणि व्यवसाय नियोजनाची कौशल्ये विद्याथ्र्यांमध्ये विकसित व्हावी हा यामागील उद्देश होता. तंत्रज्ञान, कृषी, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास या प्रकारात नवउद्योजकांनी  व्यवसाय कल्पना, उद्दिष्टे, धोरणे, व्यवसाय मॉड¬ुल तसेच आर्थिक अंदाज यानुसार आपल्या बिझनेस प्लॅन चे सादरकीरण यावेळी केले. नवउद्योजकांनी सादर केलेल्या योजनांचे तज्ज्ञ परीक्षक मंडळाने मूल्यांकन केले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक श्री आनंद यादव, सूत्रसंचालन श्री अमोल हिरुळकर यांनी केले. कार्यक्रमाला पाचही जिल्ह्यांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button