AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाला राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान

जयपूर येथे होणा-या राष्ट्रीय एकात्मता शिबीरात विद्यापीठाचे स्वयंसेवक सहभागी होणार

अमरावती (दि. 04.12.2025) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयामार्फत दि. 25 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत एस.एस.जैन सुबोध पी.जी कॉलेज, रामबाग सर्कल, जयपूर, राजस्थान येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय “राष्ट्रीय एकात्मता शिबीर” होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दींगत व्हावी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि देशभक्तीचे संस्कार रुजविल्या जावे, या हेतुने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन देशभरातील 11 राज्यांचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या शिबीराकरिता महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान एकमेव संत¬ गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाला आहे.
                विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्याथ्र्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णूता, सामाजिक बांधिलकी यासाठी विविध उपक्रमांव्दारे विद्याथ्र्यांना संस्कारक्षम, तत्परता व सक्षम करण्यासाठी नियमितपणे समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे करीत आहे. नियमीत उपक्रमाद्वारे महापुरुषांचे विचार हे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमातून घेऊन श्रमदान, युवा सप्ताह, कार्यशाळा, शिबीर व सरकारच्या विविध कार्यक्रमांत स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होत असतात.
                चमूंमध्ये प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेराचा रोहन वानखडे, जी, एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांवचा हिमांशू राठी, गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसदचा एकनाथ काळे, कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरबचा कृष्णा घरडीनकर, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा कुणाल इंगळे, श्री. वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणीची कु. प्रियंका म्हस्के, श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोटची कु. विजया अस्वार, श्री. शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखलीची कु. वैभवी मोरगंजे, श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिमची कु. वैष्णवी पानझडे व तक्षशिला इन्स्टिट¬ुट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, दारापुरची कु. संस्कृती खरडे यांचा समावेश आहे. कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू यांच्या मार्गदर्शनात श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या रासेयो महिला कार्यक्रम अधिकरी डॉ. हर्षाली वानखडे दहा विद्याथ्र्यांची चमू घेऊन चमू व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र व गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याकरीता जयपूरला रवाना होणार आहे.
                 कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व स्वयंसेवक विद्याथ्र्यांचे भरभरुन कौतुक करुन ही बाब विद्यापीठाकरिता अभिमान व गौरवास्पद असून विद्यापीठाचे नाव उंचावणारी असल्याच्या सद्भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे. रासेयो चे संचालक डॉ. निलेश कडू यांनी सर्व विद्याथ्र्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button