Crime NewsLatest NewsLaturMaharashtra

लातूर : स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अवैध देशी दारूसह एक आरोपी अटक, ₹4.23 लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असून स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून ₹4 लाख 23 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१ डिसेंबर २०२५ रोजी ही कारवाई पहाटे करण्यात आली. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून तोंडारपाटी साखर कारखाना–हंगरगा रोडमार्गे एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे ४.३५ वाजता सापळा रचून टाटा इंडिका व्हिस्टा (MH-14 FM-5881) हे वाहन थांबवले. वाहनातील एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र चालक संदीप वैजनाथ शिंगे (वय ३०, रा. लोहारा) याला अटक करण्यात आली. पळून गेलेल्या आरोपीची ओळख दिपक उर्फ जंबू पंडीत बनसोडे अशी झाली आहे.

वाहनाची तपासणी केली असता ३२ बॉक्स देशी दारू तसेच वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ₹४,२३,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ), ६५(ई), ८१ आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपीकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, मटका आणि चोरटी वाहतूक यावर पुढील काळात आणखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button