महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे काय?…. अनंत गुढे

अमरावती : सुशिक्षित, समुद्ध, शांत, संयमी प्रदेश म्हणून आजपर्यंत महाराष्टाचं नाव हिंदुस्थानात घेतलं जात होत. उत्तरेकडील राज्यातील तरुण महाराष्ट्रात व्यवसाय, उदयोग, रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. कायदा आणि सुव्यवस्था या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र क्रमांक एक वर होता.
पण आता हि स्थिती बदलत चालली आहे. कायदा व सुववस्था धाब्यावर बसविली जात आहे. पोलिसांची भीती वाटेनासी झाली आहे. या बाबतीत राज्य सरकारही काही ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर, सुजलाम -सुफालम महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, असं मत माजी खा. अनंतराव गुढे यांनी व्यक्त केले आहे.
महाराट्रात रोज खून, लूटमार, दरोडे, गांजा आणि नाशिली पदार्थांची विक्री, हे सर्व होत आहे. पुण्यात भरदिवसा खून होत आहेत. रस्त्यात अडवून लूटमार होत आहे. मात्र पोलीस प्रशासन आणि गृहमंत्रालय काहीही प्रतिबंधित उपाय करतांना दिसत नाही.
मागील आठ दिवसाचा जरी आढावा घेतला, तर निवडणुकीच्या करणाने अनेक ठिकाणी मारहाण झाली आहे. बडनेरा जुनी वस्ती येथे युवकांचा भोकसून खून करण्यात आला., यवतमाळ येथे 78 वर्षीय व्यक्तीला भोकसून घरात दरोडा टाकला आणि वीस लाख रुपये लपास केले. अकोला येथे उमेदवाराच्या पतीला बेदाम मारहाण करण्यात आली., काल अमरावतीत एका महिलेचा खून करण्यात आला. हि मागील आठ दिवसातील परिथिती आहे. पोलीस हतबल झाले आहेत. ” रोज मरे, त्याला कोण रडे ” पोलिसासाठी हि दैनंदिन कार्य झाले आहे.
नक्षलवाद सपविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्र्यांनी जबाबदारी घेतली. आज नक्षलवाद संपला आहे. अनेक नक्षलवादी मारल्या गेले. अनेकांनी शरानगती पतकरली.
महाराट्रातील गृहमंत्री मात्र शांत आहेत. त्यांनीही हि गुन्हेगारी सपविण्याचा विडा उचलावा अशी विनंती माजी खा. अनंतराव गुढे यांनी केली आहे.



