Crime NewsLatest NewsMaharashtra

नवी मुंबईत ११ महिन्यांत ४९९ मुलांच्या अपहरणाच्या घटना; ४१ अजूनही बेपत्ता

नवी मुंबईमध्ये मागील ११ महिन्यांत एकूण ४९९ मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी ४१ मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनांपैकी ४८३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यापैकी ४४२ प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून डिटेक्शन रेट ९१.७८% इतका आहे. बालकांच्या शोधासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. हरवलेल्या मुलांचा शोध लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि इतर विभागांशी समन्वय यावर विशेष भर दिला जात आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरवलेल्या मुलांच्या शोधात मदत होईल अशी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button