electionLatest NewsMaharashtra Politicspolitics

पुसद नगराध्यक्ष निवडणुकीत नाईक कुटुंबाचा उत्साह; सहकुटुंब मतदान करून दिला लोकशाहीचा संदेश

पुसद नगराध्यक्ष निवडणुकीत आज नाईक कुटुंबाने सहकुटुंब मतदान करून लोकशाहीचा उत्साह व्यक्त केला. माजी मंत्री मनोहर नाईक, इंद्रणील नाईक, मोहिनी नाईक आणि माजी नगराध्यक्ष अनिता नाईक यांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.

नगराध्यक्ष पदाची उमेदवार असलेल्या मोहिनी नाईक यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदान करताना “नाईक कुटुंबाची परंपरा पुढे सुरू राहील,” असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना इंद्रणील नाईक म्हणाले, “पुसदकरांचा विश्वास नाईक कुटुंबावर कायम राहिला आहे आणि यंदाही त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू.”

मतदानानंतर प्रतिक्रिया देताना काही नागरिकांनी “नाईक कुटुंबातीलच नगराध्यक्ष होणार,” अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वर नाईक कुटुंबाचा विश्वास असल्याचेही सांगितले जात आहे.

पुसद शहरात मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळपासून मतदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नाईक कुटुंबाच्या एकत्रित मतदानामुळे निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button