AmravatiLatest NewsLocal News
विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पीएच.डी. 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 17 डिसेंबर, 2025 पर्यंत अर्ज भरता येईल. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी याबाबतची अधिसूचना क्र. 17/2025 दि. 27 नोव्हेंबर,2025 रोजी निर्गमित केली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 16 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करणे, पात्र उमेदवारांची यादी व मुलाखती दि. 17 ते 24 डिसेंबर, संशोधन सल्लागार समितीव्दारे घेण्यात येणा-या मुलाखती दि. 26 डिसेंबर ते 02 जानेवारी, 2026, निवड झालेल्या उमेदवारांची यादी व प्रवेश निश्चिती दि. 3 ते 5 जानेवारी, ऑनलाईन नावनोंदणी दि. 6 ते 15 जानेवारी, नावनोंदणी पडताळणी यादी व पावती सादर करणे दि. 16 ते 22 जानेवारी आणि दि. 25 जानेवारी पासून पीएच.डी. कोर्स वर्क ला सुरुवात होईल.
विषयनिहाय रिक्त जागा व मान्यताप्राप्त मार्गदर्शक यांची यादी विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पेट परीक्षेतून सुट मिळालेल्या विद्याथ्र्यांचाही या प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश असेल. इच्छुक संशोधक विद्याथ्र्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज संबंधित संशोधन केंद्रांवर सादर करावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे.



