Accident NewsLatest NewsMaharashtra

जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर दोन अपघात; दोन जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

जुना पुणे–मुंबई महामार्गवर आज सकाळपासून दोन वेगवेगळ्या अपघातांची नोंद झाली आहे. देहूरोड आणि कामशेत परिसरात हे अपघात घडले असून दोन्ही ठिकाणी कार पलटी झाल्या.

पहिला अपघात पहाटे देहूरोड परिसरात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरा अपघात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कामशेतजवळ झाला. मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या कारवरील नियंत्रण चालकाचे सुटल्याने कार पलटी झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखम झाली नाही.

दोन्ही अपघातांमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button