India NewsLatest News

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी जसिर बिलाल वानी ला 7 दिवसांची NIA कोठडी

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी जसिर बिलाल वानी याला दिल्लीतील न्यायालयाने गुरुवारी (27 नोव्हेंबर) 7 दिवसांच्या NIA कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. वानीला दहशतवादी हल्ल्यांसाठी तांत्रिक मदत पुरवल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) 17 नोव्हेंबर रोजी श्रीनगरमधून अटक केली होती.

NIA ने आज वानीला न्यायालयात हजर केले. याआधी 18 नोव्हेंबरला न्यायमूर्ती अंजू बजाज चांदना यांनी दिलेली 10 दिवसांची NIA कोठडी आज संपत होती. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत NIA ने अतिरिक्त कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मंजूर केली.

या निर्णयानंतर NIA ला प्रकरणातील डिजिटल पुरावे, संपर्क साधने आणि तांत्रिक नेटवर्कबाबत पुढील तपास करण्यास मदत होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button