BuldhanacitynewsLatest NewsMaharashtraSocial News

खंडाळा येथील शासकीय वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात साजराविद्यार्थ्यांची जनजागृती रॅली ठरली आकर्षणाचे केंद्र

मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी ग्रहपाल आर. सी. मखरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि वस्तीगृहातील संपूर्ण स्टाफने संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आर. सी. मखरी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, मूल्ये आणि त्याचा समाजातील उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.

संविधान दिनाची जनजागृती गावापर्यंत पोहोचवण्यासाठी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी एक भव्य रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली खंडाळा गावातून काढण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थी उमेश शिरभैय्ये आणि चंद्रकांत अंभोरे यांनी तयार केलेली संविधानावरील पोस्टर्स आणि माहितीपर फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

रॅलीत वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला, तर संपूर्ण स्टाफही या कार्यक्रमात सहभागी झाला. भारतीय संविधानाबद्दल आदर, श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करत संविधान दिनाचा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button