हिंदी विश्वविद्यालयात भारतीय संविधानाचे लोकशाहीतील योगदान या विषयावर विशेष व्याख्यान बुधवारी

पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे असतील कार्यक्रमाचे मुख्य अतिथी
संविधान प्रस्तावनेचे वाचन, संविधान जनजागृती रॅली आणि प्रश्नोत्तर स्पर्धेचे आयोजन
वर्धा, 25 नोव्हेंबर 2025 : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात संविधान दिनाच्या औचित्याने आपले संविधान – आपला स्वाभिमान या अंतर्गत संविधान अमृत महोत्सव वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवनाच्या प्रांगणात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले जाईल. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता गालिब सभागृहात कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय संविधानाचे लोकशाहीतील योगदान’ या विषयावर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष, आयआयएम जम्मूचे अध्यक्ष तसेच इंडो-फ्रेंच सीईओ फोरमचे सदस्य पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्वागत भाषण विधि विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. जनार्दन कुमार तिवारी करतील. कार्यक्रमाचे संचालन मराठी साहित्य विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. संदीप सपकाळे करतील तर आभार प्रदर्शन अनुवाद अध्ययन विभागाच्या सहायक प्रोफेसर डॉ. मीरा निचळे करतील.
या वेळी विश्वविद्यालयाच्या विधि विभागामार्फत सकाळी 09:30 वाजता संविधान जागृती रॅली काढण्यात येईल. तसेच विधि विभागातील विद्यार्थ्यांसाठी दुपारी 03:00 वाजता विधि विद्यापीठात संविधान विषयक प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.



