रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनरस्ते अपघातग्रस्तांना 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींना आता दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून जिल्ह्यातील पात्र रुग्णालयांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाची ‘रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना’ अमरावतीसह राज्यभर अमलात येत आहे. या अंतर्गत अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने जिल्ह्यातील पात्र रुग्णालयांचे अंगिकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ओळखण्यात आलेल्या “ॲक्सिडेंट हॉटस्पॉट”च्या आधारे रुग्णालयांची यादी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर अंतिम केली जाईल.
अंगिकृत रुग्णालयांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णालयात ट्रामा, पॉली ट्रामा, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी आणि क्रिटिकल केअर अशा आवश्यक सेवा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. या सुविधा असणाऱ्या रुग्णालयांना hem2.0 प्रणालीवरून अर्ज दाखल करता येतील.
या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक
- डॉ. अंकिता मटाले – 8275095802,
- डॉ. अविनाश मरकड – 9967134252
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



