Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

मालेगाव : चार वर्षांच्या चिमुकलीवरील अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन – आरोपीला फाशीची मागणी

मालेगावमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि नंतर तिच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण समाज संतप्त झाला आहे. या नराधम कृत्याच्या निषेधार्थ सोमवारी श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानच्या वतीने राजकमल चौकात मोठं आंदोलन करण्यात आलं.

श्री शक्ती महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात अनेक नारी शक्ती, महिला संघटना, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

नागरिकांनी ‘दोषीला फाशी द्या’, ‘बालकांवरील अत्याचार थांबवा’ अशा घोषणा देत प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान श्री शक्ती महाराजांनी सांगितले की, समाजात कायद्याचा धाक निर्माण करायचा असेल तर अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिस आणि प्रशासनाने जलद आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आला असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी समाजाच्या सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button