नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल – आता १६ डबे

नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये भारतीय रेल्वेने मोठा बदल केला असून २४ नोव्हेंबरपासून ही गाडी ८ ऐवजी १६ डब्यांसह धावणार आहे. वाढत्या प्रवासी प्रतिसाद, सणासुदीची गर्दी आणि सतत वाढणारी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोच वाढल्यामुळे आसनक्षमता ५३० वरून वाढून ११२८ इतकी झाली आहे, त्यामुळे दररोज आणखी ६०० प्रवाशांना प्रतीक्षा न लागता प्रवास करता येईल.
नवीन रचनेनुसार गाडीमध्ये २ एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेअर कार कोच असतील. हा बदल नागपूर आणि इंदौर दोन्ही ठिकाणांहून एकाच तारखेपासून लागू होईल. वेग, सुरक्षा आणि आधुनिक सुविधांमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. कोच वाढल्यामुळे प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अधिक आरामदायी व सुलभ प्रवास अनुभव मिळेल.
⏱️ वेळापत्रक
इंदौर → नागपूर
- इंदौर प्रस्थान – ०६:१० सकाळी
- उज्जैन – ०६:५०
- भोपाळ – ०९:१०
- नर्मदापुरम – १०:२२
- इटारसी – १०:४५
- बैतूल – ११:५८
- नागपूर आगमन – ०२:३५ दुपारी
नागपूर → इंदौर
- नागपूर प्रस्थान – ०३:२० दुपारी
- बैतूल – ०५:२३
- इटारसी – ०७:००
- नर्मदापुरम – ०७:२२
- भोपाळ – ०८:३८
- उज्जैन – १०:४०
- इंदौर आगमन – ११:५०



