Latest News
कोल्हापुरात चुटकी वाजवून जादूटोणा

कोल्हापुरात चुटकी वाजवून जादूटोणा करणाऱ्या बाबाला अखेर कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय. सनी भोसले अस या भोंदू बाबाचे नाव आहे. आज पहाटे या भोंदू बाबाला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सनी भोसले हा भोंदू बाबा गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर मध्ये लोकांना भूतदयेची भीती दाखवून गंडा घालत होता, त्याचबरोबर त्याने एका महिलेला फूस लावून पळवून नेले होत. या भोंदू बाबाच्या टार्गेट वर मुली आणि महिला अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आणखी काही महिला आणि इतरांची फसवून केली आहे का याची चौकशी सुरू आहे.



