Latest News
कांदा दरात घसरण सुरूच; शेतकरी संकटात

आधीच अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दरघटीचा मोठा फटका बसला आहे. साठवून ठेवलेला तब्बल 60 टक्के कांदा खराब झाला असून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघे 250 ते 400 रुपये इतका किमान दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला 800 रुपये दर मिळत असला तरी एकूण परिस्थिती पाहता कांदा उत्पादन करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा विक्रीवर अनुदान मंजूर करावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.



