Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

सातूर्णा परिसरातील पेट्रोल पंपात चोरीचा प्रयत्न अपयशी

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातूर्णा परिसरात असलेल्या अभिषेक पेट्रोल पंपात पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. काचा फोडून पेट्रोल पंपात घुसण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. मात्र आतमध्ये रोकड न मिळाल्याने त्याचा प्रयत्न फोल ठरला.

ही घटना पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याने पेट्रोल पंपातील काचा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पंपामध्ये रोकड न आढळल्याने आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळविले.

राजापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, आसपासच्या CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकारानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की रात्रीच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button