Amaravti GraminAmravatiamravatinewscitynews

मेळघाटातील माता-बाल मृत्यू प्रकरणावर युवक काँग्रेस आक्रमकपालकमंत्र्यांच्या दौर्‍यात तीव्र आंदोलनाची चेतावणी

मेळघाटातील धारणे उपकेंद्रात घडलेल्या माता आणि बालकाच्या मृत्यूच्या प्रकरणानंतर काँग्रेस, विशेषतः युवक काँग्रेस, प्रशासनावर जोरदार टीका करत आक्रमक झाली आहे. आरोग्य व्यवस्थेतील सतत वाढणाऱ्या त्रुटी, गर्भवती महिलांना वेळेवर आणि आवश्यक सुविधा न मिळणे, तसेच मेळघाटाच्या आरोग्ययंत्रणेची गंभीर अवस्था—या सर्व बाबींवरून युवक काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरले आहे.

धारणे उपकेंद्रातील या दुर्दैवी मृत्यूंसाठी आरोग्य विभागातील दुर्लक्ष, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था आणि वेळेवर उपचार न मिळणे यांना जबाबदार धरत युवक काँग्रेसने संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर जवळजाड म्हणाले,
“मेळघाटात दरवर्षी माता-बाल मृत्यू वाढत असताना प्रशासन मौन बाळगून आहे. जिल्हा परिषदेचे CEO आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.”

युवक काँग्रेसने या सर्व मागण्यांची माहिती मुख्यमंत्री यांना ऑनलाइन पत्राद्वारे पाठवली असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, आगामी पालकमंत्र्यांच्या मेळघाट दौऱ्यात, युवक काँग्रेस त्यांच्या मागण्यांवर सरळ सामोरे जाऊन उत्तर मागणार आहे. समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मेळघाटातील सातत्याने ढासळत चाललेल्या आरोग्य सेवेच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसची ही भूमिका जिल्हा प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button