India NewsLatest NewsMaharashtra

महिला विरोधी गुन्ह्यावर पोलिसांची 24 तासांत तपास पूर्ण

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिला विरोधी गुन्ह्याचा केवळ 24 तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्याने पोलिसांचे कामकाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रकरणाची हकीकत अशी आहे की – दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी महिला शेतात जात असताना आरोपी महेश रामराव जाधव (वय 25, रा. करळा) याने तिला अडवून “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध करत पतीला सांगण्याची भाषा केल्यावर, आरोपीने तिच्या अंगावर येत हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि पतीला सांगितले तर बदनामी करण्याची धमकी दिली. यावरून फिर्यादीच्या तक्रारीवर पोलीस ठाणे कुऱ्हा येथे गुन्हा क्र. 385/2025 अंतर्गत कलम 74, 78, 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी सपोनी अनुप वाकडे आणि LHC करुणा रायबोले (ब. नं. 2190) यांनी तात्काळ दोन पंचांना पाचारण करून घटनास्थळ पंचनामा ई-साक्ष अॅपद्वारे पूर्ण केला. फिर्यादी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास जामिनावर मुक्त केले. तथापि, पोलिसांनी तपासाची गती कायम ठेवत केवळ 24 तासांत संपूर्ण तपास पूर्ण करून 15 ऑक्टोबर 2025 रोजी C.C. 182/2025 अंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची पडताळणी मा. एस.डी.पी.ओ. कार्यालय, चांदुर रेल्वे यांनी केली असून तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button