Latest NewsMaharashtraNagpur

१८ वर्षीय दोन तरुणांनी केला घरफोडीचा गुन्हा

नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ नोव्हेंबर रोजी रात्री एका घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी मोहम्मद शोएख शेख हे आपल्या कुटुंबासह जयताळा येथे गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मागील दार तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी आलमारी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल २१ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. गुन्हे शाखा (डिटेक्शन) आणि वाहनचोरी विरोधी पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने दोन तरुण आरोपींना अटक केली – रोहित राजेश बहेरीया वर्मा (वय १८) आणि कृष्णा उर्फ साहील मायालाल जैस्वाल (वय १८). सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने, नगदी ९ लाख ३३ हजार रुपये, आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १४ लाख २३ हजार ३०० रुपये एवढी आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सह आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त राहुल माकणीकर आणि सहायक आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक रविंद्र नाईकवाड, पोहवा शैलेश जांबुळकर, सफौ परमेश्वर कडू, चेतन जाधव, सुधीर सोदरकर, प्रफुल पारधी आणि विवेक लावे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे नागपूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button