नांदगावात कत्तलखान्याच्या जाळ्यातून सुटले 10 गोवंश

नांदगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रेल्वे गेटजवळील नविन वस्ती परिसरात झाडाझुडुपांच्या आडोशात कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले 10 गोवंश आढळून आले. मालेगाव ग्रामीण पोलीस उपअधीक्षक तेजबीर सिंग सिंधू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव आणि नांदगाव पोलिसांनी संयुक्त छापा टाकून या गोवंशांना मुक्त केले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 479/2025 नोंदविण्यात आला असून
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2025) च्या कलम 5 (ब) अंतर्गत संशयित आरोपी अरीफ कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नांदगाव पोलिसांकडे सुरू आहे. दरम्यान, या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून गोवंश तस्करीच्या या साखळीवर पोलिसांचा हा धडक छापा मोठा धक्का मानला जातो. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या तत्पर कारवाईचं कौतुक केलं असून
एकच प्रश्न उपस्थित होतो – या कत्तलखोर साखळीचा शेवट नेमका कधी होणार…?



