Latest NewsMaharashtra
पोलिसांनी केले घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

सहा नोव्हेंबरच्या रात्री सुमारे सात वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, अजनी पोलीस ठाणे हद्दीतील फुलमती लेआउट परिसरात काही संशयित हालचाली सुरू आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ परिसरात सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत घरफोडी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. अटकेतील आरोपींची नावे तुषार राऊत आणि मारुती भौतिक अशी असून, दोघेही पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी आणि एक लॅपटॉप असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे



