Latest News
पुंछ (जम्मू-काश्मीर)

पुंछ (जम्मू-काश्मीर)
सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात फटाक्यांची विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी लग्नसमारंभाच्या हंगामात लागू करण्यात आली असून, पोलिसांच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुंछचे जिल्हाधिकारी अशोककुमार शर्मा यांनी गुरुवारी (६ नोव्हेंबर) हा आदेश काढला. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या अहवालानुसार, लग्नसोहळ्यांदरम्यान — विशेषतः रात्री — फटाके फोडल्यास सुरक्षा दलांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि संभाव्य दहशतवादी हालचालींवर प्रतिसाद देण्यात अडथळा येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता.
जिल्हाधिकारी यांनी BNSS कलम 163 अंतर्गत ही बंदी तत्काळ लागू केली असून, पुढील आदेश येईपर्यंत ती कायम राहणार आहे.



