Latest NewsMaharashtra

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज – मिलिंद चिमोटे

काँग्रेस पक्षाने आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तीन ते चार महिने आधीपासूनच काँग्रेसने नियोजनबद्ध मोहिमेला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा प्रभागासाठी मिलिंद चिमोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद चिमोटे यांनी या नियुक्तीनंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्र पावसाळी संकटात असताना शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही.’ त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले की, ‘शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस हा आजच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे भरडला गेला आहे.’ काँग्रेस आता आगामी निवडणुकांसाठी सज्ज असून, त्यांचा मोर्चा जनतेच्या प्रश्नांकडे असेल असा विश्वास कांग्रेस नेते मिलिंद चिमोटे यांनी व्यक्त केलाय…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button