AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

जनसंपर्क विभाग
‘वंदे मातरम्’ गीताचे उद्या विद्यापीठात सामुहिक गान
अमरावती (दि.06.11.2025)-
‘वंदे मातरम्’ गीताने जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. वंदे मातरम् या गीताला दिडशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्·ाभूमीवर उद्या दिनांक 07 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता संत गाडगे बाबा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील ध्वजस्तंभाजवळ सामुहिक गान होणार आहे. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, संवैधानिक अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी ‘वंदे मातरम्’ या सामूहिक गान कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.



