AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

युवा स्वाभिमान पक्षाची, राष्ट्रीय व राज्य तसेच जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

भाजपा सोबत युवा स्वाभिमान पक्षाचे गटबंधन _ भाजपा व युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निवडणून आणण्यासाठी तालुका निहाय २० पदाधिकाऱ्यांची समिती
भाजपा चां नगराध्यक्ष तर युवा स्वाभिमान पक्षाचे नगर सेवक निवडणून आणण्यासाठी बैठकीत झाले नियोजन.

अमरावती| युवा स्वाभिमान पक्षाची राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त बैठक पक्षाच्या मुख्य युवा स्वाभिमान कार्यालयात संपन्न झाली. येत्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.
बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर चर्चा करून प्राथमिक निर्णय घेण्यात आले. विविध नगरपालिकांमध्ये व नगरपंचायतींमध्ये पक्षाच्या उमेदवारांची निवड, तसेच स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकीय वाटाघाटींवर सविस्तर विचारविनिमय झाला.
या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. नगर परिषद व पंचायत निवडणूक मध्ये भाजपा चे अध्यक्ष,नगराध्यक्ष व नगरसेवक व युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक निवडणून आणण्यासाठी निवडणूक तयारी अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात तालुक्यात स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही २० पदाधिकाऱ्यांची समिती लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीत युवा स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासोबतच होऊ घातलेल्या नगर परिषद व पंचायत निवडणूक संबंधी मीटिंग मध्ये उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बैठकीला प्रमुख पदाधिकारी म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष नीलकंठराव कात्रे, ज्येष्ठ मार्गदशक सुनील राणा, अँड,नंदेश अंबाडकर, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, संजय मुनोत ,कमलकिशोर मालानी, निलेश कुलकर्णी, सत्य सिंग लोटे, समाधान वानखडे, दादा रामले, प्रा.डॉ. अजयजी गाडे, सुखदेव तरडेजा, दादाराव महले, जिल्हा अध्यक्ष सौ.सोनाली नवले, सुभेदार साहेब, अविनाश काळे, मनीष अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, , मोर्शी, शेंदुरजना घाट, वरुड नगरपंचायत, धारणी व नांदगाव खंडेश्वर या नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना यश मिळवून देण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचा निर्धार व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button