AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 4 नोव्हेंबर रोजी व्याख्यानमालेचे आयोजन डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचा उपक्रम

अमरावती – (दि. 01.11.2025)
                 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवार दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

                 व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून ‘धम्मचक्र प्रवर्तनाची वर्तमान काळातील प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम हे अभ्यासपूर्ण व्याख्यान देणार आहेत.  प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

                 तरी आयोजित व्याख्यानमालेचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button