AmravatiEducation NewsLatest News

कर्मचा-यांमुळेच विद्यापीठाचा देशभरात नावलौकीक – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप

अमरावती – (दि. 31.10.2025) कोणतेही कौशल्य प्राप्त करण्याकरीता दिर्घकाळ लागतो व विद्यापीठातील कर्मचारी अथक परिश्रमाने कौशल्यप्राप्ती करुन प्रत्येक कार्य विद्यापीठासाठी निष्ठा, प्रेम आणि समर्पण भावनेने करतात. त्यामुळेच विद्यापीठाचा देशभरात नावलौकीक आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, महाविद्यालयीन विभागाच्या सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकुर, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती श्री उमेश लांडगे, सौ. श्रध्दा लांडगे, सौ. शिला राऊत, श्री राऊत, प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. धनंजय पाटील उपस्थित होते.
पुढे बोलतांना कुलगुरू म्हणाले, कर्मचा-यांवरील कामाचा ताण पाहता, तो कसा कमी करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, तव्दतच बाह्रयंत्रणेव्दारे कर्मचा-यांच्या भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत व लवकरच ही समस्या सुटेल असे आ·ाासन सुध्दा कुलगुरूंनी यावेळी दिले व सत्कारमूर्तींना भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्री उमेश लांडगे, सौ. शिला राऊत यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र देऊन, सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले, एकाचवेळी सर्व प्राधिकारणाच्या निवडणुका घेणारे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ महाराष्ट्रात पहिले विद्यापीठ आहे. तसेच कर्मचारी सुध्दा अतिशय निष्ठेने व अचुकपणे आपापली कामे करतात. अविरत कामामुळेच माणसाची ओळख होते असे सांगून त्यांनी दोन्ही सत्कारमूर्तींना भावी आयुष्याकरीता शुभकामना दिल्या. यावेळी सत्कारमूर्ती श्री उमेश लांडगे, सौ. शिला राऊत यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या प्रेम, स्नेहभावाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव डॉ. साक्षी ठाकुर, विद्यापीठ कर्मचारी संघाचे श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे, उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, कोषाध्यक्ष श्री राजेश एडले, संचालक श्री प्रवीण पडोळे यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, सूत्रसंचालन प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. धनंजय पाटील यांनी, तर आभार कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक श्री रमेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, माजी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड यांच्यासह विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button