अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई दुसऱ्यांदा करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडो थाय युवा सांस्कृतिक महोत्सवाचे नेतृत्व

थायलंडच्या राजदूत कार्यालय व भारत सरकारच्या आईसीसीआरच्यावतीने निमंत्रण
अमरावतीतील टीम झेनिथच्या कलावंतांची आंतरराष्ट्रीय महोत्सवाकरीता निवड
अमरावती – अमरावती हा सांस्कृतिक कला वैभव असलेला जिल्हा असुन या जिल्हयातील अनेक कलावंतानी येथील सांस्कृतिक वैभवाचे जतन केले आहे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली कला देखील सादर केलेली आहे. त्यातुनच ०१ ते ७ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान थायलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय इंडो थाय युवक सांस्कृतिक महोत्सवा करीता अमरावतीतील टिम झेनिथच्या कलावंताची निवड करण्यात आली असुन या महोत्सवाचे नेतृत्व अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई करणार असून तसे अधिकारिक निमंत्रण थायलंड राजदूत व भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्यावतीने डॉ गवई यांना प्राप्त झाले आहे.
डॉ.मनीष गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे .डॉ. गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रात विधायक कामगिरी केली आहे. युवा विकास क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळी वर जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या 20 ते 25 वर्षपासून केले आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळीवर देखील या विषयाला घेऊन त्यानी चीन, नेपाळ,थायलंड, भूटान, रशिया, दुबई, थायलंड सह सार्क देशात आंतरराष्ट्रीय युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळी वर राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा संदेश दिला आहे.डॉ. गवई यांच्या माध्यमातुन अमरावतीच्या मातीला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली असून डॉ. गवई आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्यांदा इंडो थाय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे नेतृत्व करणार आहेत. या महोत्सवात ते थायलंड येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात आयोजित युवा आदन प्रदान कार्यक्रमात युवकांशी संवाद साधणार असून आंतरराष्ट्रीय युवा शक्तिकरणाबाबत आपले विचार मांडणार आहेत. याच महोत्सवात टिम झेनिथ इंटरनॅशनलच्या वतीने अमरावतीतील कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक मंच नव तरुण कलाकारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असुन आगामी १ ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान थायलंडच्या बँकॉक शहरात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक युवा महोत्सवाकरीता अमरावतीचे युवा कलावंत तसेच महाराष्ट्रातील युवा कलाकार या महोत्सवात भाग घेणार आहेत . या महोत्सवाचा उदघाटन डॉ. चैतन्य प्रकाश योगी संचालक, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र भारतीय दूतावास, बँकॉक हे करणार असून या प्रसंगी श्री पॉल नरुला ‘पॉमथेप श्रीनरुला’अध्यक्ष इंडो थाई बिझनेस कनेक्ट थायलंड,श्री पीटर सोंबूनचा आरोईन कौन्सुलेट जनरल,श्री. एस. सिन्हा रॉय रिअॅलिटी स्पेसिलिस्ट थायलंड हे करणार आहेत
या आंतरराष्ट्रीय महोत्सवा दरम्यान या कलावंताना थायलंड येथील राजदुत कार्यालयात आपली कला सादर करण्याचे विशेष निमंत्रण प्राप्त झाले असुन त्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांचे देखील विशेष सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्रातील कलाकार आपली कला भारताच्या बाहेर थायलंडच्या भुमी मध्ये सादर करण्यात येणार आहे. यासाठी टिम झेनिथची आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समुहाची टिम तयार झाली असुन या निवड झालेल्या टिमचे नेतृत्व टिम झेनिथचे सांस्कृतिक प्रमुख श्री. मिथील कळंबे हे करणार असून संघात सौ प्रिती जाधव.श्री कमलाकर मरघडे, मिस सायली वर्धे,डॉ. चंदा भाकरे,मिस अंजली पाटील,मिस समिक्षा वऱ्हाडे,पल्लवी वर्धे,अनिता वर्धे , कृती मुखिया,डॉ सविता पोटदुखे, सम्राट सिंघाई या कलाकारांचा सहभाग असणार आहे यासोबतच या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे नेतृत्व दुसऱ्यांदा भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कारार्थी डॉ मनिष गवई हे करणार आहेत. सर्व सहभागी कलावंतांना टिम झेनीथच्या वतीने प्रशस्ती पत्र देवून थायलंड येथील राजदुतांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे.
अशा प्रकारच्या गौरवासाठी अमरावतीच्या युवकाची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सनमानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे ते सर्वात कमी वयाचे युवक आहेत. त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या विशेष निवड़ीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे



