विलास नगरात जेष्ठागौरी पूजा व महाप्रसादाचे आयोजन

अमरावती – विलास नगर परिसरातील पेंढारकर परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून गौरी पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेमध्ये संपूर्ण परिसरातील महिला भक्तभाविक सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने गौरी मातेची पूजा अर्चना करतात. आई गौरीच्या चरणी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करत भाविकांनी दिवसभर पूजा, आरती आणि भजन कीर्तनाचा आनंद लुटला. शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी या पूजेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि पुरुषांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवला.
महाप्रसादात सर्व समाजातील लोक एकत्र येऊन भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेताना ‘एकतेचा आणि श्रद्धेचा’ सुंदर संदेश देताना दिसले. पेंढारकर परिवाराचे हे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले असून, परिसरातील लोकांसाठी हे सणासुदीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे.



