Crime NewsLatest NewsMaharashtra

मोर्शी हत्याकांड | कृषी लिपिकाची निर्घृण हत्या, आरोपी २४ तासांत अटकेत

मोर्शी - दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी, तेजस विनोदराव राऊत यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला धाव घेत रिपोर्ट दिला की, त्यांचे वडील विनोद भास्करराव राऊत सकाळी ८ वाजता लोण केसेसच्या कामासाठी अमरावतीकडे निघाले, पण परत आले नाहीत. तपासात समोर आले की, विनोद राऊत यांचे तालुका कृषी कार्यालयात गार्डच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या बाबीची माहिती गार्डच्या पतिलाही मिळाली. त्यातून त्याच्या मनात राऊत याविरोधी वैर निर्माण झाला. धनराज सुखदेव वानखडे, रा. घाटलाडकी, श्रीकृष्णपेठ, मोर्शी यांनी या वैरातून विनोद राऊत याची कार्यालयात निर्घृण हत्या केली. मोर्शी पोलीसांनी आरोपीला शोधून २४ तासांच्या आत अटक केली. आरोपीने कबुली दिली की, त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तो वैराने भरला होता आणि याच वैरातून विनोद राऊत याला संपवले.
या कारवाईत पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार, पोहवालदार आकाश शिवणकर, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहळे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सपोनि राहुल गवई करत आहेत. मोर्शी परिसरात ही घटना खळबळ उडवून दिली आहे. समाजातील जबाबदार व्यक्तींवर विश्वास धूसर झाला असून, पोलीस यंत्रणेकडे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button