Crime NewsLatest NewsMaharashtra

फक्त फटाक्यांच्या वादातून २० वर्षीय अब्दुल सोहेलची चाकूने भोसकून हत्या! | कुटुंबीय आयुक्तालयावर धडकले

अमरावती – अमरावती शहरातील गुलदस्ता नगर परिसरात दिवाळीच्या रात्री एक भीषण घटना घडली. वीस वर्षीय अब्दुल सोहेल याची किरकोळ वादातून चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, फटाके फेकल्याच्या संशयावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच दरम्यान अब्दुल सोहेलवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सोहेलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागपूरी गेट पोलिसांनी मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुमताज या मुख्य आरोपीला तत्काळ अटक केली. मात्र, सोहेलच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाईकांचा दावा आहे की, या हत्येमध्ये आणखी काही आरोपी सामील आहेत.
आज, शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी, मृत सोहेलचे कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले. त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी हत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि या घटनेत सामील असलेल्या उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. या गंभीर घटनेमुळे गुलदस्ता नगर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button