Latest NewsLaturMaharashtra

औसा उड्डाणपूल मंजुरीकडे! | 9 महिन्यांत काम सुरू करण्याचा गडकरींचा शब्द

औसा – “लातूर जिल्ह्यातील औसा शहरातून जाणारा लातूर-औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग, औसा मोड आणि याकतपूर मोड येथे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असतो. याच गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी औसा रिंग रोड, भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाला लवकरात लवकर मंजुरी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.या संदर्भात, औसा शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाला मंजुरी मिळण्याबाबत नुकतीच एक महत्त्वाची भेट झाली. या भेटीनंतर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औसाकरांना मोठा दिलासा दिला आहे.
सध्या या उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. माहितीनुसार, DPR तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी (Consultant Company) नेमण्यासाठी निविदा (Tender) काढण्यात आली आहे, आणि या निविदेची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर, 2025 आहे.
डीपीआर तयार झाल्यानंतर, अंदाजपत्रक, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता अशा सर्व प्रक्रिया अत्यंत गतीशीलतेने पूर्ण केल्या जाणार आहेत. खुद्द मा. नितीनजी गडकरी यांनी 9 महिन्यांच्या आत उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचा शब्द दिला आहे.
डीपीआरसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, औसाकरांचे उड्डाणपुलाचे स्वप्न आता दृष्टीक्षेपात आले आहे. हा प्रकल्प केवळ औसा शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण औसा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या काही महिन्यांत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यास, वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होऊन दळणवळण सुलभ होईल.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button