AmravatiLatest NewsSports

दक्षिण पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ ज्युडो (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचे संघ घोषित

               सागे युनिव्र्हसिटी, भोपाल येथे होणा-या दक्षिण पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ ज्युडो (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे. पुरुष संघाच्या स्पर्धा दि. 13 ते 14 नोव्हेंबर व महिला संघाच्या स्पर्धा 10 ते 11 नोव्हेंबर, 2025 दरम्यान होणार आहे.
पुरुष संघ (ज्युडो)
चमूंमध्ये बी.बी. आर्टस्, एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज दिग्रसचा सागर जाधव, श्री विठ्ठल रुख्मिणी कला व वाणिज्य महाविद्यालय, सावनाचा निनाद अरसोड, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा केशव तितराम, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा राज नंदवंशी व वेध बुंदेले, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा ओमसिंह चौहान, गो.सी. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा यश पिढेकर यांचा समावेश आहे.
महिला संघ (ज्युडो)
महिला चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. सिध्दी धार्मिक, बी.बी. आर्टस्, एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.पी. सायन्स कॉलेज दिग्रसची कु. अ·िानी जाधव व कु. वैष्णवी मुधोळकर, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. प्रियंका डोंगरे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. जस्मित कौर राहल, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. श्रावणी साखरे व श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूरची कु. आरुषी सूर्यवंशी हिचा समावेश आहे.
               पुरुष संघाचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि.01 ते 10 नोव्हेंबर व महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे 29 ऑक्टोबर ते 07 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button