कुल्लु मनाली येथे होणा-या राष्ट्रीय साहसी शिबिरात विद्यापीठाचे रासेयो स्वयंसेवक होणार सहभागी

केंद्र शासनाच्या युवा व खेल मंत्रालयाच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट¬ूट ऑफ माऊंटनेअरिंग अॅन्ड इलाईट स्पोर्ट, कुल्लू, हिमाचल प्रदेश येथे दि. 15 ते 24 नोव्हेंबर, 2025 दरम्यान होणा-या राष्ट्रीय साहसी शिबिरामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सहा स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थीनींसह महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश आहे.
सदर शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा अनिकेत सवाई, बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळचा पवन कुंभेकर, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीचा रोहित वाबीटकर, ब्रिाजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाची कु. श्रध्दा यादव, श्री आर. एल. टी. विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. ऐश्वर्या घुगरे व जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरची कु. गौरी कडू तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. निलिमा दवणे यांचा यात सहभाग राहणार आहे.
कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी स्वयंसेवकांच्या सहभागाबद्दल त्यांचे भरभरुन कौतुक केले आहे. ही बाब विद्यापीठाकरिता अभिमानाची व गौरवास्पद असून विद्यापीठाचे नाव उंचावणारी असल्याचे सांगून सर्व स्वयंसेवक विद्याथ्र्यांचे कुलगुरूंनी याप्रसंगी अभिनंदन केले. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी सर्व स्वयंसेवक विद्याथ्र्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.



