ऐका दिवसात अमरावती मध्ये दोन नेत्रदान

बतरा व घोगरे परिवार यांनी केले दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
अमरावती येथील रहिवासी स्व. श्री. राजेश रामचंद्र बतरा (वय ५३) व स्व. श्री. दिनकर बाळकृष्ण घोगरे (वय ७८) यांचे दुःखद निधन झाले. दोन्ही परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला परंतु अशाही परिस्थितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने बतरा परिवार व घोगरे परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. राजेश रामचंद्र बतरा व स्व. श्री. दिनकर बाळकृष्ण घोगरे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा एजुकेशन फाउंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डायरेक्टर डॉ. अंकित हरवानी, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, कु. प्रणाली चांभारे यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे बतरा व घोगरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. बतरा व घोगरे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात बतरा परिवाराचे श्री. साहिल बतरा, श्री. संतोष बतरा, सौ. सुनिता फौजा व घोगरे परिवाराचे श्री. अतुल घोगरे, श्री. अशोक घोगरे, श्री. सौरभ घोगरे व दोन्ही परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. राजेश रामचंद्र बतरा व स्व. श्री. दिनकर बाळकृष्ण घोगरे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
भारतासमोर अंधत्वाची एक मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कोर्नेअल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा तासान पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामोळे मृत्यू नंतर ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता.
नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५ । ७३७८६५६१४४ । ९८९९८९८६६७



