Uncategorized

अमरावती शिक्षक मतदार संघात भाजपचाच आमदार! | आमदार चंदू यावलकर यांचा मोठा दावा | फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता रंगात आली आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) या दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून, मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदू यावलकर यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

‘यावेळेस आमदार भाजपचाच!’ हा निर्धार घेऊन भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने काय तयारी केली आहे? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले गेले? तसेच मोर्शी आणि बोर्डातील शेतकरी नुकसान भरपाईच्या मुद्यावर काय भूमिका घेतली गेली? यावर टाकलेला हा खास प्रकाश

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button