Latest NewsMaharashtra

धारणीतील HP गॅस एजन्सीचा उज्वला योजनेत मोठा घोटाळा उघड

धारणी : धारणी तालुक्यातील HP भाईजी गॅस एजन्सीने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी आदिवासी महिलांना गॅस सिलेंडर न देता ९ वर्षांपासून सिलेंडरची विक्री मध्यप्रदेशात केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाजसेवक प्रवीण सदाफळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शासनाच्या उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी व पहिला सिलेंडर लाभार्थ्यांना दिला जातो. मात्र, धारणीतील या एजन्सीने अनेक महिला लाभार्थ्यांना सिलेंडर दिल्याचे नोंद दाखवली, प्रत्यक्षात ते सिलेंडर मध्यप्रदेशात विक्री केले. पुराव्यानुसार विक्री करणारी गाडी मध्यप्रदेशातील खकणारमध्ये आढळली असून तिथे गुन्हा दाखल आहे आणि पंचनाम्यात एजन्सीचे नाव समोर आले आहे. यामुळे गेल्या ९ वर्षांपासून आदिवासी महिलांना उज्वला योजनेचा फायदा मिळालेला नाही आणि पुन्हा त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. उज्वला योजनेच्या नियमांनुसार प्रत्येक ग्राहकाला वेळेवर आणि योग्य दराने सिलेंडर पुरवणे, रेकॉर्ड पारदर्शक ठेवणे हे एजन्सीचे कर्तव्य आहे. तथापि, धारणीतील एजन्सीने नियमांकडे दुर्लक्ष केले असून, अनेक सिलेंडर काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि एजन्सीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली आहे. सरकारच्या उज्वला योजनेचा उद्देश म्हणजे आदिवासी महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाची सुविधा देणे, पण धारणीतील या कारभारामुळे योजना फसवी ठरत आहे, आणि यावर नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button