GadchiroliLatest NewsMaharashtraNandedParbhaniSolapur

सोलापूर, परभणी, नांदेड व गडचिरोली जिल्ह्यात मदत‑बचाव पथक तैनात; धरण विसर्गावर नियंत्रण

मुंबई : भारतातील हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळालेल्या पावसाच्या अंदाजानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी व पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांमध्ये पाणी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, सोलापूर, परभणी, नांदेड व गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये मदत व बचाव पथके तातडीने तैनात करण्यात आली आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे की, धरण विसर्ग, नदीची पातळी व पूरविषयक माहिती मिळविण्याकरिता जलसंपदा विभाग व पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यासह समन्वय साधण्यात येत आहे. तसेच, भारतीय हवामान विभागाशी नियमित संपर्क ठेवून पुढील हवामानाचे अंदाज संबंधित जिल्ह्यांना प्रदान केले जात आहेत.

जिल्हानिहाय तपशील

सोलापूर : सीना नदी वडकबाळजवळे धोका पातळीवर वाहत आहे. उजनी व वीर धरणातून विसर्गामुळे भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळी जवळ आहे. पंढरपूर तालुक्यात तातडीने स्थानिक पथके तैनात करण्यात आली आहेत.

परभणी : गोदावरी नदी धालेगाव येथे धोक्यात असून तिथे लष्कराचे पथक तैनात आहे.

नांदेड : गोदावरी नदी नांदेड येथील जुना पूल परिसरात इशारा पातळीपर्यंत पाणी वाढले आहे. तेथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात पाण्या वाढल्याने लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) परिसरात पाणी इशारा पातळीचे पार गेले आहे. त्यामुळे भामरागड व सिरोंचा तालुक्यात राज्य आपत्ती दल व स्थानिक पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील इतर भागांमध्ये देखील धरण विसर्ग, नद्या व पावसाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवत प्रशासन सज्ज आहे. मागील २४ तासांत पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुरामुळे मृत्यू व मालमत्तेचा नाश झाल्याची माहिती देखील मिळाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button