Uncategorized

शिक्षण विभागात दीक्षारंभकार्यक्रम संपन्न, ज्ञानदान हे पवित्र कर्म- डॉ. गजानन गुल्हाने


अमरावती – (दि. 29/09/2025)
                 ज्ञानदान हे पवित्र कर्म आहे. त्यामुळे ज्ञानग्रहण करा आणि ज्ञानदान करा. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करून स्वत:ला अद्ययावत केले पाहिजे. आज काळ बदलत चालला आहे. एआयलगेचच पाहिजे ती माहिती पुरवते तरी ते शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. पण एआयकडे दुर्लक्ष करता कामा नये. एआयसंबंधी कौशल्य आत्मसात केले पाहिजे. आत्मसमाधान लाभेल असे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे मार्गदर्शन सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. गजानन गुल्हाने यांनी दि. २६ सप्टेबर २०२५ रोजी संत गाडगे बाबा अमरावतीतील शिक्षण विभागातर्फे आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमात केले. प्रसंगी आपल्या भाषणातून त्यांनी शिक्षण विभागाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रणव कोलते यांनी भूषविले. प्रसंगी मंचावर डॉ. अनिल ढवळे हे उपस्थित होते.

                   प्रसंगी विभागात नव्याने प्रवेशित एम. एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून घेण्यात आला तसेच प्रसंगी त्यांना विद्यापीठातील विविध सोयीसुविधांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता निपाणे हिने तर आभारप्रदर्शन आकाश सोनोने यांनी केले. कार्यक्रमात रूपाली जगनाडे, शुभांगी वरघट, पूज्यनी गायकवाड, आशिष राऊत या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धनश्याम वाघमारे, शीतल विधाते, शुभांगी बोरेकर, कविता मेशकर, वैभव अर्मळ, अंकिती वानखेडे, कृष्णा या अंशदायी शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. भटकर यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button