AmravatiEducation NewsLatest News

गो. से. महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती कार्यशाळा’ संपन्न

खामगाव :  स्थानिक गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे स्व. शंकररावजी उपाख्य ॲड भाऊसाहेब बोबडे स्मृती सप्ताह निमित्य महाविद्यालयाच्या ‘संशोधन सल्लागार समिती’ द्वारे दिनांक २२ व २३ सप्टेंबर रोजी आयोजित विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय संशोधन कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २३ सप्टेंबर रोजी पार पडला. कार्यशाळेकरिता विविध महाविद्यालयातून सुमारे २४० संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.समारोपीय कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.एस.तळवणकर अध्यक्षस्थानी तर विशेष अतिथी म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ प्रशांत बोबडे,कार्यशाळेचे समन्वयक डॉ जी.बी.काळे, कार्यशाळेचे सचिव  डॉ हेमंत कुमार चांडक उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाच्या सत्रादरम्यान सांख्यिकी विभागातील डॉ व्ही. एस. आठवार यांनी संशोधनामध्ये सांख्यिकी विषयाचे असणारे महत्व विशद केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले कि, सांख्यिकी हा विषय संशोधन पद्धतीचा महत्वाचा भाग आहे. डेटा गोळा करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी, अर्थ लावण्यासाठी आणि सादर करण्यासाठी साधने प्रदान करते, जी संशोधकांना गृहीतके तयार करण्यास, त्यांची अनुभवात्मक चाचणी करण्यास, नमुन्यांची ओळख करण्यास, निष्कर्षांचे सामान्यीकरण करण्यास आणि वैध, पुराव्यावर आधारित निष्कर्ष काढण्यास मदत करते. तसेच  संख्यात्मक तर्कासाठी आवश्यक असलेली सांख्यिकी संशोधन निष्कर्ष आणि कार्यपद्धतीची विश्वासार्हता सुनिश्चित करते, अचूक निर्णय घेण्यास आणि विविध क्षेत्रात ज्ञान वाढविण्यास समर्थन देते. असेही पुढे त्यांनी सांगितले. त्यानंतर वाङ्‌मयचौर्य व प्रकाशन नैतिकता या विषयावर डॉ. पी. पी. ठाकूर यांनी विद्यार्थाना सांगितले कि, साहित्यिक चोरी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे शब्द, डेटा, कल्पना किंवा अभिव्यक्तींचा योग्य श्रेय न देता चोरून वापर करणे होय, यामुळे संशोधनाच्या अखंडतेला हानी पोहोचवते आणि लेख नाकारणे, मागे घेणे आणि लेखकाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. ते टाळण्यासाठी, लेखकांनी स्रोतांचे अचूक उद्धरण दिले पाहिजे,  आणि संकल्पना त्यांच्या स्वतःच्या शब्दात मांडल्या पाहिजेत, जेणेकरून मूळ साहित्य निर्मात्याला आपल्या संशोधन कार्याचा योग्य मोबदला मिळायला हवा.याबद्दल चे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक तथा प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ जी. बी. काळे यांनी कार्यशाळेच्या मूळ विषयाला वळण देत “वैज्ञानिक लेखन” या विषया बद्दल सविस्तर माहिती देत सांगितले कि, संशोधन पद्धतीमध्ये वैज्ञानिक लेखन ही एक महत्वाची प्रक्रिया आहे, जी समाजात प्रत्येकापर्यंत संशोधन पद्धती आणि निष्कर्ष स्पष्टपणे आणि अचूकपणे पोहोचवते. त्याकरिताचे लेखन पद्धतीत त्यांनी वैज्ञानिक लिखाणातील “IMRD” हा भाग  तसेच सहा “W” (why, where,,who, when,what,how)ची माहिती देत महत्व समजावून विषयाला सोपेपणाने वळण दिले. तसेच वैज्ञानिक लेखन प्रक्रिया ही वैज्ञानिक प्रक्रियेतील एक कठीण आणि अनेकदा विलंबित “शेवटची पायरी” आहे, ज्यामुळे वैज्ञानिक विचार आणि निकाल कागदावर उतरवण्याचे प्रयत्न केले जातात. असेही त्यांनी पुढे सांगितले. त्या नंतर डॉ. ए. ए. तायडे व प्रा. एन. के. धुर्वे यांनी मुलांना वैज्ञानिक लेखन च्या बद्दल प्रात्यक्षिकरित्या समजावून त्यांना संशोधन पद्धतीतील “सॉफ्टवेअर” वापराबद्दल माहिती दिली. तसेच संगणकाचा वापर करून आपण वैज्ञानिक लेखन तार्किक पद्धतीने कसे करू शकतो याबद्दलची माहिती  सांगितली. समारोपीय कार्यक्रमात विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. पी.एन. बोबडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, सर्व प्रशिक्षक वक्ते यांनी अतिशय अवघड विषयाला सोपे करून मुलांना सांगितले .संशोधन पद्धती  कार्यशाळेतून विद्यार्थाना कठोर, प्रभावी आणि नैतिक अभ्यास करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य आत्मसात होतील अशी मला खात्री आहे. या कार्यशाळा संशोधन प्रस्ताव विकसित करण्यासाठी , संशोधनात सहकार्य आणि नवोपक्रमाला चालना देतात असेही त्यांनी पुढे सांगितले.अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी सांगितले की,संशोधन पद्धती ही शैक्षणिक संशोधनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ती संशोधनाची रचना, आयोजन, विश्लेषण आणि अहवाल देण्यासाठी एक पद्धतशीर आणि कठोर प्रक्रिया प्रदान करते. ती संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते आणि ज्ञानाची प्रगती आणि प्रसार सुलभ करते. असेही त्यांनी पुढे सांगितले. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता सप्ताहाचे समन्वयक डॉ. देवेंद्र व्यास, कार्यशाळा समन्वयक डॉ जी. बी. काळे, कार्यशाळेचे सचिव डॉ. हेमंतकुमार चांडक, कार्यशाळेचे सदस्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्रकुमार गव्हाळे, डॉ. जे. डी. पोरे, डॉ. अरविंद तायडे, डॉ. पृथ्वीराज सिंह ठाकूर, प्रा. मनोज बाभळे, प्रा. अनिकेत वानखडे, प्रा. मयूर नप्ते तसेच कर्मचारी बंधूंमध्ये सर्वश्री माणिक थाटे, अशोक चव्हाण, विठ्ठल चंदनकार, अमोल बोधनकार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज बाभळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्रकुमार गव्हाळे यांनी केले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button