रेल्वे डब्यावरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताची ताकद पुन्हा सिद्ध!

मागील काही वर्षांमध्ये भारतीय संरक्षण यंत्रणांनी अतिशय अद्ययावत प्रणालीच्या शस्त्रांना प्राधान्य देत देशाचं सुरक्षा कवच अभेद्य करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची पावलं उचलली आहेत. यात आता आणखी एक मैलाचा दगड रचला गेल्यानं चक्क शत्रू राष्ट्रही हादरली आहेत. कारण, नुकतंच भारताकडून एका अशा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, जे एका रेल्वेच्या डब्यावरून लाँच करण्यात आलं.
नव्या क्षेपणास्त्रामुळं भारतीय सैन्याच्या भात्यात आता आणखी एक नवं अस्त्र आलं असंच म्हणावं लागेल. या क्षेपणास्त्राचं नाव आहे अग्नी प्राईम या मिसाइल (Agni-Prime Missile). ‘डीफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (DRDO) च्या वतीनं या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. या मिसाईलचं वैशिट्य म्हणजे धावत्या रेल्वेतूनही हे मिसाईल डागणं शक्य होणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियाद्वारे या मिसाईलची माहिती दिली. अग्नी प्राईम या मिसाईलच्या यशस्वी चाचणीमुळे रेल्वे नेटवर्कवरून मिसाईल प्रक्षेपित करण्याची क्षमता असणा-या जगातील मोजक्या देशांच्या समूहात भारताचा समावेश झालाय, असं या चाचणीनं सिद्ध केलं आहे.
अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य काय?
अग्नी प्राईम हे ‘अग्नी’ या क्षेपणास्त्र शृंखलेतील सर्वोत्तम आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेलं क्षेपणास्त्र असून, त्याची मारक क्षमता इंटरमिडीएट रेंज (मध्यम अंतरावरील मारा) असून साधारण 2000 किमीपर्यंत शत्रूचा भेद घेऊन हे क्षेपणास्त्र मारा करतं. या क्षेपणास्त्रामध्ये अनेक महत्त्वाची वैशिष्ट्यसुद्धा आढळतात.
अतियोग्य निशाणा: उन्नत नेव्हीगेशन सिस्टीममुळं हे क्षेपणास्त्र अतिशय योग्य मारा करण्यास सक्षम आहे.
वेग : अतिशय कमी वेळात हे क्षेपणास्त्र मारा करत असून त्याला अती दृश्यमानतेचीही गरज नाही.
भक्कम आखणी : हे क्षेपणास्त्र एका कॅनिस्टर (बंद पेटीत) ठेवलं जातं. ज्यामुळं धुळ, पाऊस आणि उष्णतेच्या माऱ्याचा त्यावर काहीच परिणाम होत नाही.
भारताच्या स्ट्रॅटेर्जिक फोर्सेस कमांडसाठी हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं असून, त्याची चाचणी ओडिशातील चांदीपूर इंटीग्रेटेड टेस्ट रेंज इथून करण्यात आलं.
या क्षेपणास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं रेल्वे लाँचर. हे रेल्वे नेटवर्क कोणत्याही तयारीशिवाय काम करणार असून, क्रॉस कंट्री मोबिलिटीसुद्धा देतं. अर्थात जंगल, पर्वत आणि मैदानातही ते सहजगत्या नेता येतं. यापूर्वी क्षेपणास्त्र डागण्यासाठी एक ठराविक जागा गरजेची होती. मात्र अग्नी प्राईम कोण्याही स्थितीत शत्रूला चकवा देण्यासाठी सक्षम आहे.
अग्नी प्राईम क्षेपणास्त्र काय आहे?
अग्नी प्राईम हे ‘अग्नी’ क्षेपणास्त्र शृंखलेतील एक आधुनिक, मध्यम अंतरावरील (इंटरमिडीएट रेंज) बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडसाठी विकसित करण्यात आले असून, त्याची रेंज सुमारे 2000 किलोमीटर आहे.
अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी कधी आणि कुठे झाली?
या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 24 सप्टेंबर 2025 रोजी ओडिशातील चांदीपूर इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) येथून करण्यात आली. ही चाचणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने घेतली असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स (X) वर याबाबत घोषणा केली.
अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची रेंज आणि मारक क्षमता काय आहे?
उत्तर: या क्षेपणास्त्राची रेंज 2000 किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे ते मध्यम अंतरावरील शत्रू लक्ष्यांवर प्रभावी मारा करू शकते. त्यात उन्नत नेव्हीगेशन सिस्टममुळे अतिशय अचूक निशाणा लागतो आणि कमी वेळात लाँच होऊ शकते.



