AmravatiLatest News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयांमध्ये पालक सभा संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय फ्रेजरपूरा, अमरावती येथे आज दि. 20/09/2025 शनिवार रोजी पालकसभा घेण्यात आली. या सभेला शिक्षक पालकसभा अध्यक्ष मुख्या श्री प्रवीण घोंगडे सर, मुख्याध्यापिका आशा खरबडे मॅडम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संजयजी गायकवाड, सचिव पवन गावंडे, समाजसेवक प्रमुख वक्ते सलीम भाई मिरावाले, सत्कारमूर्ती मुकेश देशमुख उपस्थित होते. पालकसभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या पालकसभेला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



