नवरात्रीच्या महापर्वावर आयोजित शंकर नगर येथील अंबा महाकुंभ भव्य रासगरबा मध्ये जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा व प्रसिद्ध टी.व्ही. अभिनेत्री शमा राज यांची विशेष उपस्थिती

संपुर्ण अमरावती शहरातुन अंबा महाकुंभ रासगरबा पाहण्याकरिता व खेळण्याकरिता नागरिकांची अलोट गर्दी
आयोजकांच्या वतीने सिनेक्षेत्रातील व छोट्या पडद्यावरील नवनवीन व प्रसिद्ध कलाकार आणून नागरिकांचे होणार मनोरंजन
अमरावती – संपुर्ण अमरावती शहरामध्ये भव दिव्य आयोजन असलेले परंपरा ग्रुप द्वारा शंकर नगर येथे भव्य अंबा महाकुंभ रासगरब्याचे आयोजन करण्यात आले असुन या रासगरब्याला संपुर्ण अमरावती शहरातुन रासगरबा पाहण्याकरिता व खेळण्याकरिता नागरिकांची अलोट गर्दी होत आहे. तसेच दररोज या रासगरब्याला प्रशासकिय अधिकारी, राजकीय नेते, उद्योगपती तसेच सिनेस्टार उपस्थित राहुन सदिच्छा भेट देत आहे. रासगरब्याच्या दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी सदिच्छा भेट देऊन रासगरब्याचा आनंद घेतला तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टी.व्ही. अभिनेत्री शमा राज या सुद्धा विशेष उपस्थित राहुन प्रेक्षकांचे आकर्षण बनल्या. या रासगरब्यातील आयोजकांनी सांगितले की दररोज या अंबा महाकुंभ रासगरब्याला नवनवीन कलाकार भेट देणार असुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे सांगितले. या रासगरब्याला दररोज जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत असुन रासगरबा पाहण्याकरिता व आनंद घेण्याकरिता येण्याचे आवाहन सुनिल राणा, नितीन अनासने, मनोज चांदवानी, राहुल बजाज, किशोर पिवाल, दिनेश सेठिया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाणे, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज भिरानी, महेंद्र लायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, विकी संतवानी, राजेश कटारिया, विनोद गुहे, रोहन शर्मा, निखील आकोटकर, किर्तीदीप सराफ, तुषार दुधे, अजय बोबडे, मनोज डहाके, सत्येंद्र मंत्री, यशपाल गुडधे, राकेश रहेजा, अजय सोजरानी, हर्षल रेवणे, आयोजकांच्या वतीने करण्यात आले.



