संस्थात्मक सुशासन व नेतृत्व विकासाची आज गरज – कुलगुरूविद्यापीठातील एम.बी.ए. विभागाच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

ख-या अर्थाने आज संस्थात्मक सुशासन आणि नेतृत्व विकासाची समाजाला गरज असून, विद्यार्थी हे करू शकतात, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्यावतीने व यूजीसी-मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कुलगुरू म्हणाले, उच्च शिक्षण संस्था ज्ञानकेंद्रच नाहीत, तर नव्या पिढीतील नेतृत्व घडविण्याची प्रयोगशाळा आहेत. कार्यशाळेच्या माध्यमातून भविष्यात विद्यापीठाला व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यासाठी ठोस दिशा मिळेल. कार्यशाळेचे समन्वयक व एम. बी. ए. विभागप्रमुख डॉ. दीपक चाचरकर यांनी स्वागतपर भाषणातून कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधकांना संस्थात्मक शिस्त, प्रशासन व नेतृत्व याविषयी नव्या दृष्टीकोनाची जोड मिळेल असे सांगितले.
‘इन्स्टिट¬ुशनल गव्हर्नन्स अँड लिडरशीप:बिल्डींग फ्युचर-रेडी मॅनेजर्स’ या थिमवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, 19 सप्टेंबर पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे.
सूत्रसंचालन करुन अतिथींचा परिचय प्रणिता गिरी हिने दिला, तर आभार डॉ. मुक्ता मंत्री यांनी मानले. कार्यशाळेत प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यशाळेमध्ये इन्स्टिट¬ुशनल गव्हर्नन्स, अॅकेडमिक लिडरशीप, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन एज्युकेशन, इमर्जिंग चॅलेंजेस इन मॅनेजमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ई फ्युचर-रेडी मॅनेजमेंट स्किल्स अशा विविध विषयांवर नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेमुळे विद्यापीठ व व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि विद्यार्थी तसेच संशोधकांना जागतिक पातळीवरच्या व्यवस्थापनातील बदल व प्रवाह समजून घेण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



