विद्या तीच, जी सर्व बंधनातून मुक्त करते – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठात नवप्रवेशित विद्याथ्र्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात
सा विद्या या विमुक्तये; अर्थात विद्या तीच, जी सर्व बंधनातून मुक्त करते आणि भारतीय परंपरेतील शिक्षण हेच सांगते असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विविध विभागांमध्ये नवप्रवेशित विद्याथ्र्यांसाठी केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ.महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे, शारीरिक व क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. तनुजा राऊत, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, कासूचे संचालक डॉ. नितीन फिरके, केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. कपिल कांबळे उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यापीठात लागू झाल्यापासून विद्याथ्र्यांची एक बॅच बाहेर पडली आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणाचा चांगला प्रभाव पडला असून, कौशल्याधारित शिक्षण, बहुविद्याशाखीय शिक्षण आणि सार्वत्रिक शिक्षण या नवीन शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टानुसार विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थी उद्यमशील कसे होतील, याचा विचार करुन अभ्यासमंडळाने त्यादृष्टीने विद्याथ्र्यांसाठी अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. आता विद्याथ्र्यांनी आपल्या भविष्याबद्दल अधिक गंभीर व्हावे आणि ज्याप्रमाणे आज जगभरातील घडामोडी एका मिनिटांत आपल्याला कळतात, त्याप्रमाणे विद्याथ्र्यांनी आपल्यात बदल करुन आपले भविष्य घडवावे, असे आवाहन सुध्दा कुलगुरूंनी याप्रसंगी केले. विद्यापीठात संविधान शिल्पाची उभारणी करण्यात आली आहे, त्यावरील संविधानाची उद्देशिका अवश्य वाचावी, तसेच ज्यांच्या नावाने आपले विद्यापीठ आहे, त्या संत गाडगे बाबांची दशसूत्री वाचून आचरण करावे आणि या महापुरुषांच्या विचारानेच आज विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे, असे सांगून त्यांनी सर्व नवप्रवेशित विद्याथ्र्यांना भविष्याच्या सुवर्णमयी शुभेच्छा दिल्या.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगतांना आज विद्याथ्र्यांकरिता मोठमोठ¬ा सोयीसुविधा आहेत, त्याचा विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा. विद्यापीठातील विविध विभागांच्या विद्याथ्र्यांनी होणा-या विविध उपक्रमांमध्ये भाग घ्यावा. विद्यापीठाचा आणखी नावलौकीक करावा, असे आवाहन करुन मिळालेल्या संधीचे सोने करा आणि आपल्या आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करा, असे आवाहन विद्याथ्र्यांना केले.
कुलसचिव डॉ. अविनाश असनारे विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, खरे तर पदव्युत्तर शिक्षण आयुष्य बदलवित असते. त्यामुळे स्वत:च्या जीवनाचे तुम्ही स्वत: शिल्पकार व्हा. राष्ट्र विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या. नवनवीन मार्ग शोधा, बागेप्रमाणे आपल्या कल्पनांना फुलवा. इतिहास घडविण्याचे सामथ्र्य तुमच्यात आहे, त्यामुळे आपला, आपल्या कुटुंबाचा आणि विद्यापीठाचा नावलौकीक वाढवा, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी विद्याथ्र्यांना केले.
दिवसभर चाललेल्या या दीक्षारंभ कार्यक्रमामध्ये सर्व नवप्रवेशित विद्याथ्र्यांना विविध विभागांचे प्रमुख डॉ. नितीन फिरके, डॉ. नितीन कोळी, डॉ. स्मिता थोरात, डॉ. अजय लाड, डॉ. सुलभा पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. राजीव बोरकर, सीए. पुष्कर देशपांडे, डॉ. तनुजा राऊत, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. अशोक राठोड, डॉ. जागृती बारब्दे यांनी आपापल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रम, योजना, शिक्षण पध्दती, सोयीसुविधा आदींविषयी विद्याथ्र्यांनी विस्तृतपणे माहिती दिली. संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकामधून केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. कपिल कांबळे यांनी दीक्षारंभ कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. सूत्रसंचालन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी, तर आभार वनस्पती विभागातील डॉ. के.सी. मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, शैक्षणिक विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नवप्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



